Home Breaking News त्या…मजुरांना चिरडणारा ट्रक अवघ्या दोन तासात ताब्यात

त्या…मजुरांना चिरडणारा ट्रक अवघ्या दोन तासात ताब्यात

1014

घटनेत दोन मजुरांचा नाहक बळी

वणी: बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान महामार्गाची डागडुजी करणाऱ्या मजुरांसाठी काळ ठरणारा व पसार झालेला ट्रक शिरपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात ताब्यात घेतला. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा बळी गेला तर तिघे गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनवट येथे घडली.

महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक (MH 31 FC 6399) च्या चालकाने अनियंत्रितपणे वाहन चालवले. रस्त्याची डागडुजी करणाऱ्या पाच मजुरांना चिरडले यात राजू मिलमीले (27) रा कोठोडा, धर्माजी भटवलकर (65) रा बेलोरा, अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मजुरांची नावे आहेत. तर सतीश गेडाम (35) रा बेलोरा, पांडुरंग अवताडे (30)रा कोठोडा, सुरेश जुनगरी (40 रा बेलोरा हे गंभीर जखमी झाले होते.

अपघात घडताच ट्रक ने घटनास्थळावरून पलायन केले होते. परंतु पुनवट येथील प्रत्यक्षदर्शींनी तत्पूर्वी त्या ट्रकचा नंबर नोंद केला होता. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ट्रक चा माग शोधण्यासाठी तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासातच मुंगोली नाक्यावरून ट्रक ला ताब्यात घेण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार