Home Breaking News भीषण…भरधाव ट्रकने पाच मजुरांना चिरडले

भीषण…भरधाव ट्रकने पाच मजुरांना चिरडले

2008

दोन ठार, तिघे जखमी
पुनवट गावाजवळ घडला अपघात

वणी : रस्त्याची डागडुजी करणाऱ्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना बुधवार दि. 4 मे ला सायंकाळी 5 वाजता घडली. हा भीषण अपघात पुनवट गावाजवळ झाला असून दोन मजुरांना घटनास्थळीच जीव गमवावा लागला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

राजू मिलमीले (27) रा कोठोडा, धर्माजी भटवलकर (65) रा बेलोरा, अशी घटनास्थळी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मजुरांची नावे आहेत. तर सतीश गेडाम (35) रा बेलोरा, पांडुरंग अवताडे (30)रा कोठोडा, सुरेश जुनगरी (40 रा बेलोरा हे गंभीर जखमी झाले आहेत.

चंद्रपूर ते करंजी पर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण आयव्हीआरसीएल या बांधकाम कंपनीने केले. अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्याला भेगा पडल्या आहेत यामुळे त्यांच्या डागडुजीचे काम सुरू होते आणि त्याच वेळी ट्रक क्रमांक (MH 31 FC 6399) भरधाव आला आणि अनर्थ घडला.

अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे.
जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला तर ट्रक चालकाचे विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार