Home Breaking News दहा लाखाच्या मुद्देमालासह दोन चोरटे गजाआड, एक फरार

दहा लाखाच्या मुद्देमालासह दोन चोरटे गजाआड, एक फरार

775

शिरपूर पोलिसांची कारवाई

वणी: आर.के.चव्हाण इन्फ्रा लिमिटेड या बांधकाम कंपनी च्या माध्यमातून रस्त्याचे नवनिर्माण सुरू आहे. साईट वरील लोखंडी सळाखी चोरट्यानी लंपास केल्या होत्या. या प्रकरणी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल करताच अवघ्या बारा तासात दोन आरोपींना गजाआड करण्यात आले असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर एक आरोपी पसार झाला आहे.

आबई फाटा ते शिंदोला रोड वरील बांधकाम सुरू असलेले साई जिनिंगचे पुलाजवळील साईट वर लोखंडी सळाखी ठेवलेल्या होत्या. चोरट्यांनी त्या सळाखी लंपास केल्या याबाबत आर.के.चव्हाण इन्फ्रा लिमिटेड चे प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत प्रभाकर येरणे व सब कॉन्ट्रॅक्टर पी. एम. उंबरकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीअंती ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपास यंत्रणा कार्यान्वित केली. गोपनीय माहितगाराच्या माध्यमातून आरोपींचा अल्पावधीतच छडा लावला. या घटनेतील अमित नथ्यू गाताडे (25) रा कुर्ली, निलेश जगन्नाथ कोडापे (30) रा. आबई ता. वणी. यांना अटक करत जॉन डियर कंपनीच्या टॅक्टर क्र. MH-29-BP-024 सह दहा लाख 19 हजार 200रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर चंचलेश सर्जेराव टेम्बुलकर (27) रा. वार्ड नंबर ४ करेल छिन्दवांडा मध्यप्रदेश हा आरोपी पसार झाला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड, सुगत दिवेकर, अभिजीत कोषटवार, संजय घोडाम यांनी केली.
वणी: बातमीदार