Home Breaking News थेट…वैधकीय अधीक्षकांना मनसेची ‘Warning’

थेट…वैधकीय अधीक्षकांना मनसेची ‘Warning’

487

(OPD) च्या वेळेत डॉक्टरांनी हजर राहावे

वणी: येथील ग्रामीण रुग्णालयात ऐन बाह्य रुग्ण विभाग (OPD) च्या वेळेत डॉक्टर गैरहजर असतात. यामुळे तपासणी तथा उपचारार्थ आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. हा प्रकार मनसे खपवून घेणार नाही तरी OPD च्या वेळेत डॉक्टरांनी हजर राहावे अशी ‘Warning’ मनसे रुग्णसेवा केंद्राचे आजीद शेख यांनी वैधकीय अधीक्षक व जिल्हा चिकित्सा अधिकारी यांना निवेदनातून दिली आहे.

ग्रामीण रुग्णालयात आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वाजतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात (OPD) रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र त्याचवेळी अपघातग्रस्त, विषप्रशान किंवा गंभीर रुग्ण दाखल झाल्यास डॉक्टरांना तपासणी करीता जावं लागते यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या OPD तील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Img 20250103 Wa0009

ग्रामीण रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणीच्या दरम्यान निर्माण होणारी अनागोंदी आठ दिवसात निकाली काढून नेमणूक झालेले सर्व वैधकीय अधिकारी (OPD) च्या वेळेत उपस्थित ठेवावे. अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी लकी सोमकुंवर, मयूर मेहता, संकेत पारखी, अमोल मसेवार, राहुल तावडे उपस्थित होते.
वणी: बातमीदार