Home Breaking News मच्छीमारीसाठी गेलेल्या इसमाचा मृतदेहच आढळला

मच्छीमारीसाठी गेलेल्या इसमाचा मृतदेहच आढळला

829
Img 20240930 Wa0028

मृत्यूचे कारण अस्पष्ट, भोईपुरा येथील इसम

वणी: भोईपुरा येथे वास्तव्यास असलेला 46 वर्षीय इसम आपल्या मित्रा समवेत मच्छीमारीसाठी वाघदरा जवळील निर्गुडा नदीवर गेला होता. त्याचे मित्र घरी परतले मात्र तो घरी परतलाच नाही. त्याची शोधाशोध करण्यात आली असता शुक्रवार दि. 13 मे ला त्याचा मृतदेहच आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

सुनिल मारोती पारशिवे (46) हा भोईपुरा येथील निवासी आहे. गुरुवारी सकाळी तो आपल्या दोन मित्रांसोबत वाघदरा शिवारातील निर्गुडा नदीवर मासळी पकडण्यासाठी गेला होता. तिघांनी पकडलेल्या मासळीचे समसमान वाटप करण्यात आले. दोघे आपापला हिस्सा घेऊन घरी परतले तर सुनील तेथेच थांबला होता.

रात्र झाली तरी सुनील घरी परतला नाही म्हणून त्याची शोधाशोध करण्यात आली मात्र तो मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला शोधण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी गेलेली असताना निर्गुडा नदीवरील रामघाटाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सूचना दिल्या, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्याचा मृत्यू कशाने झाला हे अस्पष्ट असले तरी पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार