Home वणी परिसर TDRF जवानांकडून सामाजिक एकतेचा संदेश

TDRF जवानांकडून सामाजिक एकतेचा संदेश

493
Img 20240930 Wa0028

विविध सामाजिक उपक्रम राबवले

वणी : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या TDRF ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले. याप्रसंगी एकता दौड आणि जनजागृती रॅली काढण्यात आली तर सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

येथील नगर भवन मध्ये दि. 9 मे ला वर्धापन दिन सोहळा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी ठाणेदार रामकृष्ण महल्ले होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. नीलिमा दवणे, TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद मंचावर होत्या.

अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले की, TDRF चे आपत्ती व्यवस्थापनातील कार्य उत्कृष्ट आहे. सर्वांनी आपल्या पाल्याला TDRF मध्ये टाकावे त्यांच्यावर चांगले संस्कार होईल असे म्हणून TDRF द्वारा करण्यात आलेल्या 17 वर्षातील कार्याचे कौतुक केले सोबतच TDRF संस्थापक यांचे सुद्धा कौतुक केले.

TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रस्तावना करीत 17 वर्षात करण्यात आलेल्या बचावकार्य, मदत कार्य व राष्ट्र सेवेत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. नीलिमा दवणे यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की TDRF हे पाल्यांसाठी फार गरजेचे आहे, TDRF मध्ये राहून पाल्य शिस्त व संस्कार या गोष्टी आत्मसात करून समाजसेवा, राष्ट्रसेवा करण्यासाठी तयार होत असल्याचे स्पष्ट केले.

TDRF संचालक हरिश्चंद्र ब राठोड यांच्या मार्गदर्शनात जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस व मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जेऊरकर यांनी तर आभार प्रदर्शन काजल वाळके यांनी केले.

वर्धापन दिन सोहळ्याला कंपनी कमांडर गणेश बुरांडे, नयन उरकुडे, मनीष आवारी, सानिया आसुटकर, रवीना कौरासे, अक्षय आवारी, अनुष्का नक्षणे, धनश्री पत्रकार, लक्ष्मीकांत घाडगे, त्रिशा कालेकर, राहुल गोस्की, माहेश्वरी राजपूत व इतर सर्व TDRF जवान व अधिकारी सोबतच शिक्षक, पालक उपस्थित होते.
वणी: बातमीदार