Home Breaking News लायन्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

लायन्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

224

नर्सरी ते 12 वी विज्ञान प्रवेश

वणी:- येथील नावलौकिक असलेली लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये नर्सरी ते 12 पर्यंतच्या वर्गात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंग्रजी माध्यमाची शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल ही पहिली शाळा आहे. एका छोट्या जागेत सुरू केलेली ही शाळा आता वटवृक्षा प्रमाणे मोठी झाली आहे.

या शाळेच्या शहरात देशमुख वाडी, नांदेपेरा रोड व रवी नगर येथे अद्यावत अश्या तीन इमारती आहे. कॉम्पुटर लॅब व प्रयोग शाळेने सुसज्ज असलेल्या या शाळेत तज्ञ शिक्षकां कडून अध्ययनाचे कार्य गेल्या अनेक वर्षे पासून सुरू आहे.

शैक्षणिक सत्र सन 2022 ते 2023 या वर्षे करिता नर्सरी ते 12 वी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी जन्म दाखल्याची दुय्यम प्रत, आधारकार्ड ची दुय्यम प्रत, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मार्कलिस्टची दुय्यम प्रत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजता पर्यंत देशमुखवाडी येथील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपर्क साधता येईल. 7378576008 या क्रमांकावरही अधिक माहितीसाठी संपर्क साधता साधता येईल. केवळ मोजक्या जागा उपलब्ध असल्याने पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार