Home Breaking News पाच दिवसांचा ‘अल्टीमेटम’ अन्यथा आमरण उपोषण

पाच दिवसांचा ‘अल्टीमेटम’ अन्यथा आमरण उपोषण

671

67 शेतकऱ्यांनी पुकारला एल्गार
बुधवार पासून साखळी उपोषण

वणी: बाजार समितीच्या नाकर्तेपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ‘त्या’ व्यापाऱ्यांनी सोयाबीन उत्पादक शेकडो शेतकऱ्यांना करोडोचा गंडा घातला आहे. पाच महिने लोटले तरी अद्याप चुकारा न मिळाल्याने ऐन हंगामाच्या दिवसात बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

आर्थिक पीडित 26 शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत तातडीने निर्णय घ्यावा असे साकडे घातले होते. मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने 67 शेतकरी बुधवार दि.18 मे पासून साखळी उपोषण करणार आहेत. पाच दिवसात चुकारे मिळाले नाही तर आमरण उपोषणाचा ‘अल्टीमेटम’ देण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे मार्फत दिनांक 5 ते 7 जानेवारी ला परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा व त्याचा जामीनदार रूपेश कोचर यांनी 67 शेतक-याकडुन सोयाबीन, तूर आदी धान्य खरेदी केले होते. परंतु आजपावेतो खरेदी केलेल्या धान्याचे पुर्ण चुकारे देण्यात आले नाहीत.

शेतकऱ्यांनी या आर्थीक फसवणुकी विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन सर्व शेतक-यांचे चुकारे तातडीने देण्यात यावे असे आर्जव केले होते. मात्र आज पर्यंत चुकारे देण्यात आले नाहीत यामुळे उपोषणाचे हत्यार उगारण्यात आले आहे. पाच दिवसात थकीत रक्कम मिळाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
वणी: बातमीदार