Home Breaking News त्या…चिमुरडीला न्याय द्या, मनसे आक्रमक

त्या…चिमुरडीला न्याय द्या, मनसे आक्रमक

721
Img 20240613 Wa0015

धडक मोर्चा ने दणाणले मारेगाव

वणी: समाजमन सुन्न करणारी घटना मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे 9 मे ला घडली होती. विकृत नराधमाने केलेले कृत्य चीड निर्माण करणारे आहे. त्या पीडित चिमुरडीला न्याय मिळावा याकरिता मनसे प्रचंड आक्रमक झाली असून गुरुवारी मारेगावात धडक मोर्चा काढण्यात आला.

चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी शीघ्रगती न्यायालयात खटला चालवून त्या नाराधमाला कठोर शासन व्हावे यासाठी गुरुवार दि. 19 मे ला मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

पहापळ येथे दि. 9 मे ला 32 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिला काटेरी फासात फेकले होते. बेशुद्धावस्थेत ती चिमुरडी रात्रभर त्या काटेरी झुडपात निपचित पडली होती. दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली असता अत्याचाराचे बिंग फुटले होते. घटनेचे गांभीर्य बघून पोलीस प्रशासनाने तपासाचे चक्र शिताफीने फिरवून ‘त्या’ विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या होत्या.

मारेगाव तालुक्यात काळिमा फासणारी घटना घडल्याने समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. आरोपी नराधमाला कठोर शासन व्हावे यासाठी मनसे आक्रमक भूमिकेत आहे. या प्रकरणाचा शीघ्रगती न्यायालयात खटला चालवून त्या नाराधमाला कठोर शासन व्हावे अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे.

यावेळी संतोष रोगे, अर्चना बोदाडकर, नगरसेविका अंजुम शेख, संगीता सोनुले, आरती राठौड़, प्रिया लाभने सिंधु बेसकर, सुशीला बोधाले, अभिलाषा निमसटकर, माया पारखी, मंदा पारखी, वैशाली तायडे, धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकर, विलन बोदाडकर, शिवराज पेचे, चांद बहादे यांचेसह मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक व नागरिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार