Home Breaking News सुसंधी….’सुशगंगा’ मध्ये मेगा कॅम्पस प्लेसमेंट

सुसंधी….’सुशगंगा’ मध्ये मेगा कॅम्पस प्लेसमेंट

264

नामांकित कंपनीचा सहभाग

वणी: सुशगंगा पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेण्यासाठी, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बेताची असलेले विध्यार्थी येतात. त्यांची गरज लक्षात घेता मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह 23 मे ला आयोजित करण्यात आला आहे. ही सुसंधी विध्यार्थ्यांना प्राप्त व्हावी याकरिता संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार सातत्याने प्रयत्न करताहेत.

अंतिम वर्षात शिकत असलेले व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी पॉलिटेक्निक मधून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल या विषयात शिकताहेत ते या मेगा कॅम्पस मध्ये सहभागी होऊ शकतील. यावेळी निवड झालेल्यांना उत्तम पद व पगार आणि अन्य सुविधा कंपनी प्रशासन उपलब्ध करून देणार आहेत.

शहरातील प्रतिथयश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड, अनुवी केमिकल ठाणे प्रायव्हेट लिमिटेड, IQVIA RSD प्रायव्हेट लिमिटेड गैसस्टैंप ऑटोमोविव प्राईवेट लिमिटेड या 6 नामांकित कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार