Home Breaking News ‘ती’ माहेरी गेली अन व्यथित पतीने गळफास घेतला

‘ती’ माहेरी गेली अन व्यथित पतीने गळफास घेतला

812

मारेगाव तालुक्यातील घटना

मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका येथे वास्तव्यास असलेल्या 28 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी माहेरी गेल्यामुळे व्यथित झाल्याने त्याने हे आत्मघाती पाऊल उचलल्याचे बोलल्याजात असून ही घटना शनिवार दि. 28 मे ला दुपारी उघड झाली.

शुभम उत्तम देवतळे (28) असे मृतकाचे नाव आहे. तो म्हैसदोडका येथील निवासी होता. क्षुल्लक कारणावरून त्याची पत्नी माहेरी गेली होती यामुळे तो व्यथित झाला होता. घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.

शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गळफास घेतल्याची घटना उघड होताच बघ्यांची गर्दी उसळली. याप्रकरणी मारेगाव पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. त्याचे पश्चात वडील, पत्नी व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
मारेगाव: बातमीदार