Home Breaking News फिजिओथेरपिस्ट पदवी मिळताच कोठारी परिवारात ‘रौनक’

फिजिओथेरपिस्ट पदवी मिळताच कोठारी परिवारात ‘रौनक’

397

वणीतच करणार प्रॅक्टिस

वणी: कोठारी परिवारातील ‘रौनक’ मुळातच हुशार आणि मितभाषी. आपल्या हातून दिन दुबळ्यांची सेवा व्हावी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शिक्षण घेतले. शुक्रवार 27 मे ला पदवीग्रहण समारंभात रौनक कोठारी याना डॉक्टरच्या पदवीने गौरविण्यात आले.

‘रौनक’ हा येथील पत्रकार जितेंद्र कोठारी यांचे चिरंजीव आहेत. त्याला नुकतीच फिजिओथेरपिस्ट पदवी बहाल करण्यात आली आहे. ‘रौनक’ चे शालेय शिक्षण येथील स्वर्णलीला इंटरनेशनल शाळेत झाले. फिजिओथेरपीचे पुढील शिक्षण जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयात पूर्ण केले.

डॉ. रौनक कोठारी याने आपले यशाचे श्रेय आपले आई, वडील, बहीण, परिजन, स्वर्णलीला शाळेचे प्रिन्सिपल व शिक्षक तसेच डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जळगाव येथील शिक्षकांना दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेल्या फिजिओथेरपी बाबतची सेवा डॉ. रौनक वणीतच देणार असल्याने एक उमदा, होतकरु फिजिओथेरपिस्ट वणीकर नागरिकांना लाभला आहे.
वणी: बातमीदार