Home Breaking News “मुस्कान” रासेयो स्वयंसेवक पुरस्काराची मानकरी

“मुस्कान” रासेयो स्वयंसेवक पुरस्काराची मानकरी

333

लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी

वणी:  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्काराची यादी जाहीर केली. येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय रा.से.यो.ची स्वयंसेविका मुस्कान सय्यद ही उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

मुस्कान सय्यद हीने रा.से.यो.मध्ये अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले असून जनजागृती अभियान, पाणी बचाव अभियान, रक्तदान, मतदान, मुलीच्या जन्माचे स्वागत करू या अभियान, आपत्कालीन व्यवस्थापन यात विशेष योगदान असून ती TDRS मध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतांना समाजजिवनात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेतून हजारो विद्यार्थ्याना प्रशिक्षणातून धडे देण्याचे काम केले आहे.

कोरोना काळात रूग्णाना मदतीचा हात सुद्धा मुस्काननी दिला आहे. बेटी बचावो बेटी पढाओ या ब्रिद वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण मुस्कान असून तीच्या कार्याची दखल डॉ.दिलीप मालखेडे, कुलगुरू यांच्या सक्षम नेतृत्वात व डॉ.राजेश बुरंगे संमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरस्कार निवड समितीने घेतली आहे.

आपल्या यशाचे क्षेय प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे रा.से.यो कर्तव्यदक्ष कार्यक्रम अधिकारी व मुस्कान च्या मार्गदर्शीका डॉ.निलीमा दवने तसेच  प्रा. किशनघोगरे आणि तिचे आई वडील यांना देते.
वणी: बातमीदार