● आमदार बोदकुरवार यांचे गौरवोद्गार
वणी: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे महामेरू स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्ण कुटुंबाची आहुती दिली. देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी देशभक्तांनी फौज उभी केली. ते एक महान देशभक्त होते. असे गौरवोद्गार त्यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काढले.
येथील स्वातंत्र्य वीर सावरकर चौकात त्यांच्या जयंती दिनी एक छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, नगर संघचालक किरण बुजोणे, भाजपाचे जेष्ठ नेते दिनकरराव पावडे, संघाचे जिल्हा सहकार्यवाह दीपक नवले प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातंत्र्य वीर सावरकरांचा प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित अतिथींनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्वातंत्र्य वीर सावरकर हे देशासाठी अनुकरणीय व्यक्तिमत्व होते. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन भाजपचे नेते अनिल पोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुप पावडे, सुनील ठाकरे, एकनाथ मांडवकर, संजय दोरखंडे, विनायक एकरे, विनायक डहाळकर, मुन्ना शेख, संकेत आक्केवार, विकास अड्रस्कर यांनी परिश्रम घेतले.
वणी : बातमीदार