Home Breaking News तालुक्यात दोघांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यात दोघांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

815

विषारी औषध केले होते प्राशन

वणी: तालुक्यातील सुकनेगाव येथील 22 वर्षीय तर चिखलगाव येथील 30 वर्षीय तरुणांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या दोन्ही घटना शुक्रवार दि. 3 जून ला घडल्या.

महादेव गंभीर उरवते (22) हा तरुण सुकनेगाव येथील निवासी आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने विषारी द्रव प्राशन केले. घरच्या मंडळींना ही घटना कळताच त्याला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत चिखलगाव येथे वास्तव्यास असलेला मारोती लक्ष्मण जांभूळकर (30) याने सुध्दा राहत्या घरीच विषारी औषधाचा घोट रिचवला. त्याला सुद्धा तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता दोघांची प्रकृती स्थिर आहे.
वणी: बातमीदार