Home Breaking News प्रतिबंधित बियाण्याची विक्री, 26 हजाराचे बियाणे जप्त

प्रतिबंधित बियाण्याची विक्री, 26 हजाराचे बियाणे जप्त

1287

परवाना नसताना करत होते विक्री

वणी: पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय महादेव वानखडे यांना कायर येथे प्रतिबंधित बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. शनिवार दि. 4 जूनला त्यांच्या पथकाने एका सलून च्या दुकानातून 26 हजार रुपयांचे बियाणे जप्त करून शिरपूर पोलिसात दोघांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

वणी उपविभागात प्रतिबंधित बियाण्याची होत असलेली विक्री आणि कृषी विभागाची होणारी डोळेझाक सर्वार्थाने कारणीभूत आहे. उप विभागात बिनधास्त चोर बीटीची विक्री होत असल्याचे शनिवारी केलेल्या कारवाईने सिद्ध झाले आहे.

सोहन रामल्लु सुत्तरवार (41) रा. कायर व शिवाजी कवडु मांडवकर (32) रा. बाबापूर असे गुन्हा नोंद झालेल्याची नवे आहेत. कायर येथे सुत्तरवार यांच्या मालकीचे सोहन हेअर सलून आहे. येथे प्रतिबंधित कापुस बियाण्याची अनधिकृत विक्री सुरू असल्याची माहीती मिळताच बनावट ग्राहक पाठवून पंचायत कृषी विभागाच्या पथकाने धाडसत्र अवलंबले.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी वानखेडे यांनी सापळा रचला. बनावट ग्राहक म्हणून पंकज शेंद्रे यांना त्या सलून मध्ये पाठवले. तिथे मिनाक्षी बि.टी. बियाने बाबत विचारणा केली असता मांडवकर याने बियाण्याचे दोन पाकीट आणून दिले. याचवेळी पथकाने धाड टाकली आणि सुत्तरवार यांच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे 25 हजार 920 रुपयांची 32 पाकीटे आढळून आली.

मिनाक्षी 545 SSB-94BG-II असे वर्णन तसेच मागील बाजुस उत्तपादक कंपनी सफल सिड अँन्ड बायोटेक लिमिटेड, A-2 जुनी MIDC जालना व विपनन हिदुस्थान अँग्रो सायन्स प्लाँट नंबर 401 VSS नंददिप अँपार्टमेंट पेट बशिराबाद जेडीमेट्टा कुशबल्लापुर मेडचल मल्लकाजगिरी हैदाबाद तेलंगना 500015 या कंपनीचे लॉंट नंबर 50130 चे पॅकीट ताब्यात घेण्यात आली. सदर बियाणे महाराष्ट्रात परवानगी नसताना विक्री करीत असल्यामुळे तसेच बियाणे विक्रीचा परवाना नसल्याने शिरपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी सोहम रामल्नु सुत्तरवार व शिवाजी कवडु मांडवकर यांचेवर परवानगी नसलेले कापुस बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक करणे. बियाणे अधीनियम 1966 कलम 19 सहकलम बियाणे नियंत्रण आदेश 1983 खंड 3 (1) नुसार बियाणे विक्री परवाना नसतानाही विक्री करने बाबत शिरपूर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
वणी: बातमीदार