Home Breaking News धक्कादायक….चिमुरडीसह मातेने घेतला ‘गळफास’

धक्कादायक….चिमुरडीसह मातेने घेतला ‘गळफास’

1156

मातेचा मृत्यू, चिमुरडी बचावली

मारेगाव: तालुक्यात मंगळवार दि. 7 जूनला धक्कादायक घटना उघडकीस आली. 24 वर्षीय मातेने 9 महिन्याच्या चिमुरडीला सोबत घेत साडीच्या साह्याने गळफास घेतला. यात मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चिमुरडी सुदैवाने बचावली आहे. घडलेल्या घटनेने परिसरात कमालीची हळहळ व्यक्त होत आहे.

रोशनी आशिष झाडे (24) असे मृतक महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचे दोन महिण्यापूर्वी निधन झाले होते. यामुळे तिला नैराश्याने ग्रासले होते त्यातच ती वडिलांकडे मार्डी येथे राहायला आली होती. मंगळवारी पहाटे तिने चिमुरडी व स्वतःला सोबत घेत साडीच्या साह्याने गळफास लावला. लहानगी चिमुरडीचा फास सैल झाल्याने ती खाली कोसळली तर रोशनी चा दुर्दैवी मृत्यू झाला.

मार्डी येथील जितेंद्र वैद्य यांची रोशनी ही एकुलती एक मुलगी तिचा दोन वर्षांपूर्वी शेखापुर तालुका हिंगणघाट येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना नऊ महिण्यापूर्वी गोंडस मुलगी झाली होती. आणि सुखीसंसारला दृष्ट लागली, दोन महिण्यापूर्वी पती आशिष चा मृत्यू झाला होता.

मंगळवारी सकाळी त्या अभागी महिलेचे वडील जितेंद्र वैद्य यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत रोशनी दिसली त्यांनी एकच टाहो फोडला. यामुळे शेजारी जमा झाले त्यांनी मारेगाव पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
मारेगाव: बातमीदार