Home वणी परिसर मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये परिचय संमेलन

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये परिचय संमेलन

715

पालक – शिक्षक यांचेसह परिचर्चा

वणी: चालू शैक्षणिक वर्षांपासून मार्कंडेय पोदार लर्न स्कूल सुरू होत आहे. गुणवत्ते सोबतच विद्वत्तेचा संगम निर्माण व्हावा याकरिता शनिवार दि. 4 जूनला परिचर्चा आयोजित करण्यात आली होती.

आयोजित परिचर्चेत पालक, विध्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी शिक्षक व पालकांचा परिचय करण्यात आला. संस्थेचे ट्रस्टी, मुख्याध्यापिका प्रामुख्याने चर्चेत सहभागी झाले होते.

सम्मेलनामध्ये उत्तमोत्तम विद्या प्राप्त करण्यासाठी आमंत्रित पालकांचा सल्ला घेण्यात आला. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, नवीन प्रस्तावाचे व शंकाचे निरसन करण्यात आले.

रविवार दि. 5 जून, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालक, विध्यार्थी व शिक्षकांच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाज कल्याणाची भावना उत्त्पन्न व्हावी याकरिता विद्यालयाच्या प्रांगणालगत “पाणपोई” चे निर्माण करण्यात आले.

मार्कंडेय पोदार लर्न स्कूलच्या वतीने 13 ते 18 जून या कालावधीत आयोजित “समर कॅम्प” बाबत अवगत करण्यात आले तर शाळेतील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात पालक, विध्यार्थी उपस्थित होते.
वणी: बातमीदार