Home Breaking News ते…..वादग्रस्त विधान करणाऱ्यावर कारवाई करा

ते…..वादग्रस्त विधान करणाऱ्यावर कारवाई करा

769

मुस्लिम समाज बांधवांचे राष्ट्रपतींना निवेदन

वणी: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व नेत्यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद (सल्लल्लाहो अलैह वा सल्लम) यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केले. याचे पडसाद भारतासह संपूर्ण जगात उमटताहेत. वणी येथील शहर ए मदिना सोशल फाउंडेशन व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने त्या वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रपतीना करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजातील व्यक्तिमत्त्व आणि आदरणीय पवित्र मोहम्मद (स.) यांच्यावर अशोभनीय टिप्पणी करून आमचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा अपमान करण्याचे धाडस केले आहे. त्या वादग्रस्त विधानाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ नवीन जिंदाल यांनी ट्विट करून त्या वादग्रस्त संवादाचे सातत्याने समर्थन केले आहे. तसेच नरसिंहानंद सरस्वती यांनी सुद्धा वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करत इस्लाम धर्माला विरोध केला आहे.

वादग्रस्त विधान करणाऱ्यावर शासन व प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झालेली नाही. या तीन व्यक्ती देशाच्या जातीय सलोख्याला, देशाच्या अखंडतेला मोठा धोका आहे. त्यामुळे देशाची सामाजिक व्यवस्था बिघडू शकते आणि देशात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. वादग्रस्त विधान करणे म्हणजे देशाची अखंडता आणि शांतता भंग करण्याची योजनाबद्ध चाल आहे.

या घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईच्या मागणी करिता शुक्रवार दि. 10 जूनला येथील शासकीय मैदानावर शेकडो मुस्लिम बांधव एकत्रित येवून या घटनेचा निषेध नोंदवला व उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती सह पंतप्रधान यांना निवेदन पाठवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी रज्जाक पठाण, अब्दुल कामील, अ. सत्तार खा पठाण, असीम हुसेन, मंजूर हुसेन, सलीम शेख, शेख रफिक, हिदायत पठाण, अब्दुल जाफर, जावेद पठाण सह शेकडो मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
वणी: बातमीदार