Home Breaking News नेरड (पुरड) ग्राम विविध कार्यकारी सोसायटी संस्थेची अविरोध निवड

नेरड (पुरड) ग्राम विविध कार्यकारी सोसायटी संस्थेची अविरोध निवड

745

वणी : नेरड (पुरड) ग्रा. वि. का सह. संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकाची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष म्हणुन गजानन लक्ष्मण किन्हेंकार व उपाध्यक्ष म्हणुन विनायक नथ्थु तुराणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे नवनिर्वाचित संचालक म्हणुन गणपत मारोती लेंडागे, संतोष कुचनकार, उमेश कुचनकार, रविद्रं नक्षिणे, चंद्रकांत बोंडे, भाऊराव मिलमिले, वंसता थेटे, अंबादास उमरे, रामदास करलुके, बेबी राजगडकर, सुचिता ठावरी यांची निवड करण्यात आली.

संस्थेच्या अविरोध निवडणुकीसाठी गावातील प्रतिष्ठीत नागरीक झिंगु पिंपळशेंडे, वंसता मोहीतकार, बोढे गुरुजी अनिल कुचनकार, निळकंठ ठावरी, बबन ठावरी, नामदेव कुचनकार , अशोक थेटे, केशव आमणे, पुरुषोत्तम कुचनकार, दिलीप कुचनकार, महादेव आवारी, संजय लेंडागे, संजय कुचनकार, अजय कुचनकार अशोक कुचनकार भाऊराव चिने व कवडु तुराणकर यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार