Home वणी परिसर शिक्षिका नेहा गोखरे यांना पुरस्कार

शिक्षिका नेहा गोखरे यांना पुरस्कार

120
Img 20240613 Wa0015

रसायनशास्त्रज्ञ डॉ. ए. ए .नातू यांच्या हस्ते गौरव

वणी : अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दि. 5 जूनला राज्यस्तरीय नवोपक्रम शिक्षक पुरस्कार देण्यात आला. जि. प.शाळा सिंधीवाढोणा येथील उपक्रमशील शिक्षिका नेहा जयंत गोखरे यांना जगविख्यात रसायनशास्त्र आय. आय. एस. इ. आर. चे अध्यक्ष डॉक्टर ए.ए. नातु यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा पुरस्कार त्यांनी शाळेत राबविलेल्या विविध शैक्षणिक साहित्य, तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या गुणगौरवा बद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

याप्रसंगी राज्य विज्ञान संस्था नागपूर चे माजी संचालक, डॉक्टर रवींद्र रमतकर, यवतमाळ चे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डायट चे प्राचार्य प्रशांत गावंडे, वसंत महाले, सेवानिवृत्त नामदेव गोपेवाड, डायटचे अधिव्याख्याता नितीन भालचंद्र, गजानन गोपेवाड (राज्य संघटक), अग्निपंख समूहाच्या आयोजिका गीतांजली अतकारे व अर्चना वासेकर उपस्थित होत्या.