● प्रवेश प्रक्रिया रविवारी सुरू
● एक वर्षाकरिता बस सेवा मोफत
वणी: मॅकरून स्टुडंट अकॅडमीने आपल्या प्री प्रायमरी शाळेच्या प्रवेश प्रक्रिया कक्षाचा नुकताच शुभारंभ केला होता. सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरू करण्यात आली असून प्री प्रायमरी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विषेश सूट देण्यात आली आहे. तर एक वर्षाकरिता बस सेवा निशुल्क असणार आहे. तरी या सुसंधीचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
वरोरा मार्गावरील अगदी मोक्याच्या ठिकाणी मॅकरून प्री प्रायमरी शाळेचा उदघाटन सोहळा 7 जूनला थाटात पार पडला. याप्रसंगी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शाळा प्रशासनाने, कोरोना कालखंडातील शैक्षणिक अस्थीर्य लक्षात घेत पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मॅकरून स्टुडंट अकॅडमीने प्रवेश प्रक्रिया आरंभली आहे. प्री प्रायमरी शाळेत KG 1, KG 2, STD 1, STD 2 या वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे. यामध्ये प्रवेश शुल्कामध्ये वार्षिक सूट तसेच विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुसंधी केवळ 27 जून पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया रविवारी सुध्दा सुरू राहणार आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधेने सज्ज शाळा सुरू होत आहे. तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त क्लासरूम, खेळण्याची मुबलक जागा, स्विमिंग टॅंक, झुले इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्कूलबसची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी ही शहरातील एक प्रख्यात शिक्षण संस्था आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. शहरात नव्याने सुरू होणाऱ्या प्री प्रायमरी मध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे कऱण्यात आले आहे.
● अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क ●
9923522400, 8554036501, 7410756433, 9921888588
पत्ता: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर, वरोरा रोड, वणी
मुख्य शाखा: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, वडगाव रोड, वणी