Home Breaking News चिमुरडी सोबत वात्रट चाळे, पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद

चिमुरडी सोबत वात्रट चाळे, पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद

1562

शेजारी राहणाऱ्यानेच केले लाजिरवाणी कृत्य

वणी: माणुसकी, इज्जत आणि संस्कृतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललाय. घराच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय मुलानेच चक्क 6 वर्षीय चिमुरडी सोबत अश्लील, वात्रट चाळे केल्याची घटना बुधवार दि. 15 जूनला शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी आई-वडिलांच्या तक्रारी वरून बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सध्यस्थीतीत सोशल मीडिया, महागडे मोबाईल आणि त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या लैंगिक चित्रफिती तारुण्यात प्रवेश करणाऱ्याना उत्तेजित करताहेत. पालकांचे होणारे दुर्लक्ष, ऑन लाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब आणि पालकवर्गानी सोडलेली संस्कृतीची दिशा नव तरुणासाठी भविष्यात काळोख पसरवणारी आहे.

बुधवारी दुपारी ‘त्या’ चिमुरडीच्या आई ने शेजारी वास्तव्यास असलेल्याच्या घरी चाळणी परत करण्यासाठी बालिकेला पाठवले होते. ती चिमुरडी त्या घरी गेली असता तेथे उपस्थित 17 वर्षीय बालकाने चाळणी घेतली व तिच्या सोबत अश्लील व वात्रट चाळे करायला लागला. यामुळे ती चिमुरडी भेदरली, आणि तिने आपल्या घरी पळ काढला.

घडलेली घटना तिने आई ला सांगितली, ही घटना विकृतीचा कळस असल्याने तिने शेजारी राहणाऱ्यांना जाब विचारला मात्र. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेणाऱ्याच्या विरोधात वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार