Home Breaking News बॅक व्यवस्थापकांना मनसेचा सज्जड दम..!

बॅक व्यवस्थापकांना मनसेचा सज्जड दम..!

356

वेळेत पिककर्ज वाटप करा अन्यथा….

वणीः पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राष्ट्रीयकृत बॅकांच्या व्यवस्थापकांना पञ देत शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज दयावे अन्यथा मनसे स्टाईल प्रश्न मार्गी लावू असा सज्जड दम दिला आहे.

खरीपचा हंगाम सुरू झाला आहे बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतांना बॅका पिककर्ज वाटपात आखडता हात घेत आहे. लाखमोलाच्या जमीनीवर अत्यल्प पीककर्ज देण्यात येते. हे बँकांचे फसवे धोरण नेमके अमलात कोण आणतो असा खोचक सवाल उंबरकरांनी उपस्थित केला आहे.

बँका समोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. ठरलेल्या मुदतीत पीक कर्जाचे वाटप करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामापूर्व कामे पूर्ण झालेली आहे. यंदा मॉन्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा याकरिता बँकांनी पुढाकार घ्यावा. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला सावकाराचा उंबरठा ओलांडण्याची वेळ येवू नये ही खबरदारी सुद्धा बॅकांनी घ्यावी असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकांनी आठ दिवसांत कोणताही अडथळा न आणता शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे. जमिनीच्या किमती ग्राह्य धरून त्याप्रमाणे कर्ज वाटप करावे. पीक कर्जाअभावी तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याने जीवाचे काही बरेवाईट केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा ईशारा देण्यात आला आहे. असे निवेदन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणी तील सर्व बँक प्रशासनाला दिले आहे.
वणीः बातमीदार

कोणतीही बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब करत असेल तसेच शेती संबंधित कुठल्याही कमाबद्दल त्रास देत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावू.
राजू उंबरकर
( राज्य उपाध्यक्ष मनसे)