Home Breaking News संताजी इंग्लिश मिडीयमचा निकाल शंभर टक्के

संताजी इंग्लिश मिडीयमचा निकाल शंभर टक्के

282

श्वेता ताजने अव्वल तर खुशी सहारे द्वितीय

वणी: श्री. संताजी ज्ञान प्रसारक मंडळ व्दारा संचालित संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून 91.40 टक्के गुण प्राप्त करत श्वेता सुभाष ताजने प्रथम आली तर 91.20 टक्के गुण मिळवत , कु. खुशी हेमंत सहारे द्वितीय आली आहे.

संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे माहीम मरिअम आसिफ शेख हिने 89.60 टक्के, सलोनी प्रमोद दुबे हिने 88.60 टक्के, आकांक्षा अरुण चिंचोलकर हिने 86.80टक्के गुण मिळवले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुध्दा प्राविण्य मिळविले आहे.

विध्यार्थाना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय च. पोटदुखे, उपाध्यक्ष रमेश दा. येरणे, सचिव धनंजय आंबटकर, सहसचिव ओमप्रकाश निमकर, संचालक दिलीप पडोळे, तानाजी पाऊनकर, वसंतराव महाकरकार, भरत गंधारे, विलास क्षिरसागर, मंगेश येनुरकर तसेच संचालिका व शाळेच्या पर्यवेक्षिका शोभा गंधारे तसेच शाळेच्या मुख्यध्यापिका सीमा कुरेकार व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वणी: बातमीदार