Home Breaking News मार्कंडेय पोदार मधील समर कॅम्पचा समारोप

मार्कंडेय पोदार मधील समर कॅम्पचा समारोप

266
Img 20240930 Wa0028

● विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलागुण

वणी: मार्कंडेय पोदार लर्न स्कुलने दि 13 जून ते 20 या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश साध्य करण्यासाठी तज्ञ शिक्षकांनी परिश्रम घेतले. या समर कॅम्पचा समारोप दि. 21 जून ला करण्यात आला.

नव्यानेच सुरू झालेल्या मार्कंडेय पोदार लर्न स्कुलने दि 13 जून ते 20 या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्प मध्ये स्केटिंग, कराटे, नृत्य, झुंबा एरोबिक्स, कॅलिग्राफी, ड्रॉईंग, आर्ट अँड क्राफ्ट, व्यवक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण, संगीत,मेहंदी व संगणकाचे प्रशिक्षण तज्ञ शिक्षकां कडून देण्यात आले.

आयोजित समर कॅम्प मध्ये विविध कला गुणांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले. समारोप प्रसंगी शाळेचे संस्थापक रमेश सुंकुरवार, सविता रमेश सुंकुरवार, राहुल सुंकुरवार, प्राची राहुल सुंकुरवार, कुणाल सुंकुरवार, पूनम कुणाल सुंकुरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्कंडेय पोदार शाळेच्या प्रिन्सिपल लता रफेल यांच्या मार्गदर्शनात शाळेतील पाटील, त्रिवेदी, देशमुख व इतर शिक्षिका यांनी समर कॅम्प व समापन कार्यक्रमात सहकार्य केले. याप्रसंगी मोठया संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
वणी: बातमीदार