Home Breaking News नियोजनबद्ध रणनीतीमुळेच पतसंस्थेचा वाढता ‘ग्राफ’

नियोजनबद्ध रणनीतीमुळेच पतसंस्थेचा वाढता ‘ग्राफ’

496

800 कोटींची उलाढाल आणि 22 शाखा

वणी: विदर्भात नावारूपास आलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होत आहे. 800 कोटींची वार्षिक उलाढाल, तब्बल 42 हजार सभासद आणि 22 शाखा आहेत. पतसंस्थेला यशोशिखरावर पोहचविण्यासाठी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे कठोर परिश्रम, नियोजनबद्ध रणनीतीमुळेच पतसंस्थेचा ‘ग्राफ’ कमालीचा वाढला आहे.

वणी शहर व परिसरातील नागरिकांचे श्री. रंगनाथ स्वामी हे कुलदैवत आहेत. त्या दैवताच्या नावाने अस्तित्वात आलेल्या पतसंस्थेच्या जडणघडणीत ऍड. काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. छोट्याशा कक्षात सुरू झालेली संस्था सध्यस्थीतीत वातानुकूलित ऐसपैस कार्यालयात रुपांतरीत झाली आहे.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ऍड. काळे यांच्या नेतृत्वात “जय सहकार पॅनल” निवडणूक रिंगणात आहे. 26 जूनला निवडणूक होत आहे. अनुभव व सभासदा सोबत असणारे ऋणानुबंध लक्षात घेता ‘सहकार’ चा प्रभाव कोणीही नाकारणार नाहीत.

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे शिल्पकार संचालक मंडळ राहिलेले आहेत. ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवत वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या विजया करिता सभासद सरसावले आहेत. निवडणुकीत सभासद मतदारांचा कौल महत्वपूर्ण असला तरी अपेक्षित निकाल, निवडणुकीअंती उजागर होणार आहे.
वणी: बातमीदार