Home Breaking News बनावट FDR…अखेर बँक संचालकांवर गुन्हा दाखल

बनावट FDR…अखेर बँक संचालकांवर गुन्हा दाखल

1531

जिप अभियंत्यांनी केली पोलिसात तक्रार

वणी: जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत निघालेल्या कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी बँक संचालक तथा कंत्राटदार राजीव येल्टीवार यांनी बनावट FDR तयार केले. आणि कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या संचालकांचे बिंग फुटल्याने चांगलाच गदारोळ झाला होता. तब्बल चार महिन्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम अभियंत्यांच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. 1 यवतमाळ यांचे निविदा कंत्राटदार आर. एम. येल्टीवार यांनी निविदा क्र. 20 व 21 नुसार निन्मत्तम निविदा भरली होती. याकरिता त्यांनी अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून 18 लाख 10 हजार रुपयांच्या एकूण 16 पावत्या बनावट बनवून त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सादर केल्या होत्या.

जिल्हा परिषद बांधकाम विभागात सादर केलेल्या FDR च्या पावत्या बनावट असल्याची कुणकुण लागताच चांगलाच गदारोळ झाला. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषद घेवून प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती तसेच विधान सभेत प्रश्न उपस्थित केला होता.

या गंभीर प्रकरणाच्या विस्तृत चौकशीअंती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दि. वा. कुटे यांचे वतीने कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत यांनी पाटण पोलिसात रीतसर तक्रार दाखल केल्याने बँक संचालक असलेले राजीव येल्टीवार यांचेवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार