Home Breaking News सहकारचा झंजावात आणि विरोधकांची त्रेधातिरपट

सहकारचा झंजावात आणि विरोधकांची त्रेधातिरपट

522

ऍड. काळे यांनी प्रचारात मारली मुसंडी

वणीः श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. नागरीकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पतसंस्थेतीलच अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आपले स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सत्ता आणि प्रशासनातील ही लढत रंगतदार वळणार असली तरी प्रचार यंत्रणेतील सहकारचा झंजावात यामुळे विरोधकांची त्रेधातिरपट उडाल्याचे दिसत आहे.

ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. विदर्भात ठेवीदारांच्या विश्वसनियतेला पात्र ठरणाऱ्या पतसंस्थेच्या 22 शाखाआहेत तर 800 कोटीच्या वर वार्षिक उलाढाल आहे. नागरीकांच्या ठेवीवर चांगले व्याजदर पतसंस्था देत आहे. ऍड. काळे यांच्या नेतृत्वातील श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था म्हणजे विश्वासाचे प्रतिक बनले आहे. संस्थेत हजारो सभासदाना समावून घेत कुटूंब प्रमुख म्हणुन ऍड. काळे यांची दैदिप्यमान कारकीर्द राहीलेली आहे.

विस वर्षापुर्वी अगदी लहानशा कक्षात स्थापन झालेल्या रंगनाथ स्वाामी पतसंस्थेचे रोपटे विशाल वटव्रक्ष झालेले आहेत. याकरीता ऍड. काळे यांनी घेतलेले अफाट परिश्रम आणि संचालक व सभासदांचे असणारे सहकार्य खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे. सध्यस्थितीत पतसंस्थेचे 827 कोटी 36 लाख रुपये खेळते भांडवल आहेत. आज पर्यंत 406 कोटींचे कर्ज वाटप पतसंस्थेने केले आहे. तर 2 कोटी 23 लाख रुपयांचा निव्वळ नफा पतसंस्थेला मिळत आहे.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने अथक प्रयत्नांती ठेविदारांच्या ह्रदयात कोरलेले आगळेवेगळे स्थान आणि मिळवलेली अभिजात विश्वसनीयता यामुळेच काही माजी संचालकांना अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहे. तर सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ताब्यात असावी असे स्वप्न राजकीय धुरंधरांना दिवसा पडत असल्यानेच निवडणूक लादल्या गेली आहे. बहुतांश सभासदांच्या संपर्कातील ऍड. काळे यांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी न झाडता संस्थेचा सर्वागीन विकास व्हावा याकरीता आखलेली रणनिती व प्रचार यंत्रणेतील झंजावात यामुळे विरोधकात त्रेधातिरपट उडाल्याचे दिसत आहे.
वणी: बातमीदार