Home Breaking News जय सहकार ची विजयाकडे घोडदौड

जय सहकार ची विजयाकडे घोडदौड

340

ऍड. काळे यांची सभासदात क्रेझ

वणी: तब्बल वीस वर्षांपासून झपाटल्यागत श्री. रंगनाथ स्वामी पतसंस्थेला यशोशिखरावर पोहचविणारे ऍड. देविदास काळे यांची सभासदात कमालीची क्रेझ आहे. काही माजी असंतुष्ट संचालकामुळे निवडणूक लादण्यात आली आहे. मात्र शहरात जय सहकार पॅनल ने काढलेल्या मिरवणुकीने सभासदात जोश संचारला आहे.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होत आहे. 800 कोटींची वार्षिक उलाढाल, तब्बल 42 हजार सभासद आणि 22 शाखा आहेत. पतसंस्थेला प्रगतीपथावर पोहचविण्यासाठी अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे कठोर परिश्रम सर्वश्रुत आहे.

ऍड. काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल मध्ये विवेकानंद मांडवकर, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, लिंगारेड्डी अंडेलवार, पुषोत्तम बद्दमवार, गोपाळराव पिंपलशेंडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, घनश्याम निखाडे, परीक्षित एकरे, चिंतामण आगलावे, सुनील देठे, निमा जीवन, छाया ठाकुरवार निवडणूक रिंगणात आहेत.

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे शिल्पकार संचालक मंडळ राहिलेले आहेत. ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवत वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या विजया करिता सर्वच सभासद मतदार कसोशीने निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. सभासदानीच घेतलेल्या पवित्र्यामुळे जय सहकार ची विजयाकडे घोडदौड सुरू झाली आहे.
वणी: बातमीदार