Home Breaking News मतदानाचा टक्का घसरला आणि धाकधूक वाढली

मतदानाचा टक्का घसरला आणि धाकधूक वाढली

1137
C1 20240924 20095263

रंगनाथ मध्ये केवळ 35 टक्के मतदान

वणी: विदर्भातील प्रतिथयश पतसंस्था म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक रविवार दि. 26 जूनला पार पडली. तब्बल 36 हजार 187 सभासद मतदार असताना केवळ 12 हजार 696 म्हणजेच 35 टक्केच मतदान झाल्याने दोन्ही पॅनल मधील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

वणी येथे मुख्य शाखा असलेल्या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी दोन पॅनल रिंगनात होते. ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वातील जय सहकार पॅनल व ऍड भास्कर ढवस यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल ने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.

वणी 10 हजार 183 पैकी4 हजार 466, मारेगांव मध्ये 2 हजार 775 पैकी 1 हजार 592, मुकूटबन 1 हजार 481 पैकी 657, घाटंजी 2 हजार 447 पैकी 1 हजार 93, वरोरा 6 हजार 148 पैकी 1 हजार 78 गडचांदुर 2 हजार 105 पैकी 742, राजुरा, 2 हजार 219 पैकी 620, मुल 713 पैकी 217, भद्रावती 2 हजार 551 पैकी 594, यवतमाळ 608 पैकी 116, आर्णी 301 पैकी 112, ब्रम्हपुरी 613 पैकी 275 असे मतदान झाले.

रंगनाथ स्वामी पतसंस्थेत मागील विस वर्षापासून ऍड देविदास काळे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र काही माजी संचालकांनी एकत्रीत येत संस्थेची धूरा आपल्या हातात घेण्याची व्यूहरचना आखली. तर माजी आमदार वामनराव कासावार यांचा पाठींबा मिळवला होता.

रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 14 शाखेतील मतदानाच्या आकडेवारीत कमालीची घट झाली आहे. वणी अंतर्गत एकून 10 हजार 183 सभासद मतदार असतांना केवळ 4 हजार 466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण  36 हजार 187 सभासद मतदारांपैकी 12696 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
वणी: बातमीदार