● 700 ते 800 मताच्या फरकाने सर्वच उमेदवार पुढे
वणी: श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला यशो शिखरावर पोहचविणारे ऍड. देविदास काळे यांनी आपला करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. सोमवार दि. 27 जूनला मतमोजणी होती यात आत्तापर्यंत जय सहकार पॅनल चे सर्वच उमेदवार विरोधकांपेक्षा 700 ते 800 मताच्या फरकाने पुढे आहेत.
ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्त्वात जय सहकार पॅनलच्या माध्यमातून 17 संचालक पदाकरिता उमेदवार रिंगणात उभे होते. यात विवेकानंद मांडवकर, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, लिंगारेड्डी अंडेलवार, पुषोत्तम बद्दमवार, गोपाळराव पिंपलशेंडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, घनश्याम निखाडे, परीक्षित एकरे, चिंतामण आगलावे, सुनील देठे, निमा जीवन, छाया ठाकुरवार यांचा समावेश होता.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीत तब्बल 36 हजार 187 सभासद मतदार असताना केवळ 12 हजार 696 म्हणजेच 35 टक्केच मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. वणी विभागात 10 हजार 183 सभासद मतदार असतांना केवळ 4 हजार 466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथेच ऍड. काळे यांना ‘लीड’ मिळेल असे भाकीत करण्यात येत होते.
मतमोजणी प्रक्रिया येथील बाजोरिया मंगल कार्यालयात होत आहे तब्बल 70 टक्के मतमोजणी सुरूआहे. ऍड. काळे यांच्या जय सहकार पॅनल ने विरोधक परिवर्तन पॅनलच्या उमेदवारापेक्षा 700 ते 800 च्या फरकाने मताधिक्य घेतल्याने जय सहकार पॅनल चा विजय निश्चित समजल्या जात आहे.
वणी: बातमीदार