Home Breaking News संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन, प्रशासन नमले

संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन, प्रशासन नमले

445

पुरड ते वेळाबाई यामार्गाची करणार डागडूजी

वणी: माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वात कुंड्रा येथील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डयात आंदोलन केले. जड वाहनांची वाहतूक ठप्प करण्यात आली यामुळे संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी दाखल होत पुरड ते वेळाबाई यामार्गाची दुरुस्ती तत्काळ करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

खनिजांच्या जड वाहनातून होणाऱ्या वाहतुकीमुळे पुरड ते वेळाबाई यामार्गाची पूर्णतः चाळणी झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली मात्र मस्तवाल अधिकारी जुमानत नव्हते. जड वाहनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था व प्रशासनाचे दुर्लक्ष लक्षात घेता कुंड्रा ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

Img 20250103 Wa0009

सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी जड वाहनांची वाहतूक ठप्प केली, परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आंदोलनस्थळी दाखल झाले. याप्रसंगी संतप्त ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेता या मार्गाची डागडूजी तत्काळ करण्याची ग्वाही दिली.

यावेळी विजय ठावरी, अंकूश ठावरी, शुभम गोरे, मारोती थेरे, हरिदास बुच्चे, सुभाष अत्राम, बाळू गेडाम, भालचंद्र नैताम, वसंत भोसकर, बंडू कोंगरे, किशोर निब्रड, अरुण ठावरी, निलेश लांडे, अनिल ढेंगले, दिलीप वाभिटकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी: बातमीदार