Home Breaking News जिल्हाधिकारी यांचा वेकोलीला ‘दणका’

जिल्हाधिकारी यांचा वेकोलीला ‘दणका’

1611

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आदेश

वणीः वेकोली प्रशासनाने घोन्‍सा जवळील नाल्‍याचा नैसर्गीक प्रवाह बदलल्‍याने पुराचे पाणी गावात शिरले तर हजारो हेक्‍टर वरील शेती पाण्‍याखाली आल्‍याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. घडलेल्‍या या घटनेमुळे स्‍थानिकांत संतप्‍त भावना निर्माण झाली होती. जिल्‍हाधिकारी अमोल येडगे यांनी वेकोली प्रशासनाला धारेवर धरत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आदेश दिलेत तर वळ‍विण्‍यात आलेला नाला पुर्ववत करण्‍याचे सुचविले आहे.

तालुक्‍यातील घोन्‍सा कोळसा खाण परिसरातील तीन नाल्‍याचे पाणी गावाच्‍या दिशेने वळविण्यात आले तर विदर्भा नदी काठावर वेकोलीने मातीचे ढिगारे टाकण्‍यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय, आठवडी बाजाराचा परिसर पुर प्रवण क्षेञात येवून जिवीत व वित्‍तहानी होण्‍याची शक्‍यता बळावली होती.

वेकोली प्रशासनाच्‍या बेबंदशाहीचा ञास स्‍थानि‍कांना सातत्‍याने सहन करावा लागतो. वणी घोन्‍सा राज्‍यमार्ग क्रमांक 314 वरील अस्‍तितत्‍वास असलेल्‍या नाल्‍याचा स्‍ञोत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता परस्‍पर वळविण्‍यात आला. तसेच रार्जमार्ग क्षतीग्रस्‍त करण्‍यात आला. हा राज्‍यमार्ग महत्‍वाचा असुन शिबला, पाटण, झरी व अदिलाबाद कडे वाहतुकीची मोठी रहदारी असते.

वेकोली प्रशासनाने मनमर्जीने केलेले वर्तन यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घोन्‍सा गावात पाणी शिरले तर हजारो हेक्‍टर शेतपिके बाधीत झालीत. ग्रामस्‍थांनी संताप व्‍यक्‍त करत आ.संजीवरेडडी बोदकुरवार यांना संपर्क साधला. तर मनसेचे उपाध्‍यक्ष राजु उंबरकरांनी जिल्‍हाधिकारी यांचे सोबत संपर्क साधून वेकोली प्रशासनाच्‍या चुकीने घडलेला हा प्रकार असुन तात्‍काळ बाधीतांना नुकसान भरपाई दयावी असे आर्जव केले होते.

जिल्‍हाधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्‍काळ आदेश निर्गमित केले असुन वेकोली प्रशासनाने नाल्‍याचा स्ञोत राज्‍यमार्गाच्‍या मध्‍यापासुन 15 मिटर अंतरावर नेवून रस्‍त्‍याच्‍या समांतर घेवून नाल्‍यास मिळवावा तसेच नाल्‍याच्‍या बाजुने कॉक्रीटची संरक्षण भिंत उभारावी जेणेकरुन राज्‍यमार्गाला क्षती होणार नाही असे आदेशीत केले आहे.

वेकोली प्रशासनाने विदर्भा नदिच्‍या हददीत व पुरनियंञण रेषेच्‍या आत उत्खननात निघालेले दगड, माती, मुरूम खडकाचे ढिगारे टाकून पुराचा प्रवाह घोन्‍सा गावाच्‍या दिशेने जाणार नाही याकरीता नाल्‍याचा प्रवाह पुर्ववत करण्‍याचे आदेश दिले आहे. तसेच पुराच्‍या पाण्‍यामुळे शेतीचे जे नुकसान झाले त्‍यांचे नियमानुसार पंचानामा केल्‍यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे सुचविण्‍यात आले आहे. तर भविष्‍यात याच समस्‍येमुळे जिवीत व वित्‍तहानी झाल्यास संपुर्ण जबाबदारी वेकोली प्रशासनाची राहील असे आदेशातून खडसावण्‍यात आले आहे.
वणी: बातमीदार