Home Breaking News मनसेची मागणी सफल, शाळा दोन दिवस बंद

मनसेची मागणी सफल, शाळा दोन दिवस बंद

491
C1 20241123 15111901

निवासी जिल्ह्याधिकारी यांचे आदेश धडकले

वणी :- वणी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. यामुळे मनसेच्या वतीने तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शाळा बंद ठेवण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी दि 15 व 16 जुलै ला तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेज दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

वणी तालुक्यात वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, विदर्भा व निर्गुडा आशा चार प्रमुख नद्या दोन दिवसापासून दुथडीभरून वाहताहेत. त्यातच पावसाचा जोर कमी होताना दिसत नाही यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफूटी प्रमाणे पाऊस होत आहे. संपूर्ण जिल्हयात मुसळधार पाऊस पडत आहे.

वणी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 401 मिमी पाऊस झाल्याची नौद झाली आहे. सोमवार 11 जुलै रोजी एका दिवसात तालुक्यात 55 मिमी पाऊस कोसळला तर मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली आहे आणि सध्यस्थीतीत रिपरिप सुरूच आहे.उपविभागातील अनेक गावात पाणी साचले असून काही ठिकाणी झाडांच्या फांदया तुटल्या आहेत. ठिकठिकाणी रस्ते देखील खचल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

वणी शहर व ग्रामीण भागात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. ग्रामीण भागात अनेक शाळा जीर्ण अवस्थेत असून शाळेची पडझड झाल्यास विद्यार्थ्याच्या जीवास मोठा धोका निर्माण होणार असल्याचे मनविसेचे निवेदनातून स्पष्ट केले होते.

प्रभारी जिल्हाध्यक्ष शुभम भोयर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फाल्गुन गोहकार, विलन बोदाडकर, राजू बोदाडकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभव पुराणकर, रोशन शिंदे, रुचिर वैद्य, गुड्डू धोटे ,मिथुन धोटे, राजेश कोल्हेकर, सारंग चिंचोलकर, लोकेश लडके यांनी निवेदन देत शाळा बंद ठेवण्याची मागणी केली होती.

वणी शहरात व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून येजा करतात. सध्याची स्थिती बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता खबरदारी म्हणून निवासी जिल्ह्याधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दोन दिवस शाळा बंदचे आदेश दिले आहेत.
वणी: बातमीदार