Home Breaking News सात दिवसाचा अल्टीमेटम, अन्यथा खड्डयात बसून आंदोलन

सात दिवसाचा अल्टीमेटम, अन्यथा खड्डयात बसून आंदोलन

297
Img 20240930 Wa0028

गणेशपुरातील रस्ते खड्डयांच्या विळख्यात

वणी: गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत निवासी वसाहतीचे जाळे पसरले आहे. त्यातच वणी शहर लगतच असल्याने रहदारी कमालीची वाढली आहे. वाहन चालकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना कवायत करावी लागत असल्याने छत्रपती महोत्सव समिती व गावातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत निर्गुडा नदी पुलाजवळील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा खड्डयात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायती समोरील मुख्य गावात येणाऱ्या रस्त्यापासून निर्गुडा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला संपूर्ण रास्ता हा खड्डामय झालेला आहे. त्या रस्त्यावरून गावातील विद्यार्थी, महिला, पुरुष व वयोवृद्ध नागरिक रोज आपल्या दैनंदिन कामाकरिता वणीला ये -जा करीत असतात. तसेच गावावरून बाहेर गावात जाण्याकरिता वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी वणीपासून-गणेशपूर पर्यंत येणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्या भयाण खड्डयांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती स्थानिक वर्तवत आहे. ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला सूचना देत तात्काळ खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गणेश काकडे, विवेक ठाकरे, प्रशांत काळे, गजानन चंदावार, स्वप्नील थेरे , निखिल एकरे, अक्षय राजूरकर, राजू गजरे, मनोज गादेवार, श्रीहरी मोहीतकर, सुभाष वैद्य, विकास चिडे, हर्ष घाटे, बाबा गेडाम, निखिल वाभीटकर, विकास पेंदोर, गौरव काळे, रोशन काकडे, प्रशांत खारकर, सुनील मुजगेवार, सुगम बेलेकर, प्रशांत नागतुरे, सुनील बोबडे, दत्तू डाखरे, हनुमान सोयाम, राकेश मांडवकर, आशिष बोबडे, भास्कर गोरे, आकाश मोहितकर, दक्ष गादेवार व समितीचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार