● बचाव पथक तैनात, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
● शेकडो घरे धाराशाही, प्रशासन सतर्क
वणी: मागील काही दिवसांपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. त्यातच धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पाण्याने शिरकाव केला आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन समीतीने बचाव पथक तैनात केले असून फसलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याकरिता रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.
तालुक्यातील चौदा गावात प्रशासनाने ‘रेडअलर्ट’ घोषित केला आहे. पोलीस पाटील व सरपंच या गाव प्रमुखांना पत्र पाठवून गावात पाणी शिरल्यास सर्व ग्रामस्थांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करावे असे आदेशीत केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीकोनातुन कोणतीही जीवितहाणी व वित्तहाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सुचवले आहे.
●महाराष्ट्र सैनिकांनो सज्ज व्हा●
वणी उपविभागामध्ये मुख्यतः वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसलेला आहे. नागरिक अडकलेत, त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. बधितांना व गावातील प्रत्येक नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांनी सज्ज राहावे असे आदेश मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिले आहे तसेच मदत पुरवायची असल्यास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील 80 घरे जमीनदोस्त झालीत तर 30 हजार हेक्टर शेती बाधित झाली आहे. रांगणा, भुरकी, जुगाद, शिवणी, झोला, कोना, अहेरी, जुनाडा, उकणी, सेलू (खु), सावंगी, चिंचोली, नायगाव (बु), मुंगोली ही चौदा गावे पूर प्रभावित आहेत. उकणी गावाला पुराचा चांगलाच फटका बसला असून 71 घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. सरपंच सचिन खाडे, ग्रामसचिव किशोर आत्राम व ग्रामस्थ बचाव पथकाची भूमिका बजावत आहे.
बेंबळा प्रकल्प, नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा ही धरणे भरली आहेत. तर ईसापूर धरणातून वक्रद्वारे उघडून सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. तत्पूर्वीच वर्धा व पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरले आहे. तहसीलदार निखिल धुळधर यांच्या नेतृत्वात तालुका आपत्ती व्यवस्थापन समीती कामाला लागली आहे.
वणी: बातमीदार
ही बातमी सुद्धा वाचा…..
https://rokhthok.com/2022/07/18/16887