Home Breaking News CBSE बारावीत ‘झिलमिल’ तर दहावीत ‘महेक’ अव्वल

CBSE बारावीत ‘झिलमिल’ तर दहावीत ‘महेक’ अव्वल

3883

स्वर्णलीला ची यशस्वी परंपरा कायम

वणी : केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल ने यशस्वी परंपरा कायम ठेवली. बारावीत झिलमिल वर्से हिने 92.08 टक्के तर दहावीत महेक अजय लाल हिने 98.06 टक्के गुण प्राप्त करत तालुक्यातून अव्वल येण्याचा मान पटकावला.

केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE) दि. 22 जुलै ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यामध्ये स्वर्णलीला शाळेची प्रेक्षा छाजेड हिने 98 टक्के, ओम अकुलवार 97 टक्के, योगेश तिवारी 96.08 टक्के गुण प्राप्त केले आहे. तर 25 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुणासह प्राविण्य प्राप्त केले आहे.

बारावीच्या परीक्षेत स्वर्णलीला ची हर्ष तरुणा 85.06, अनुष्का पोटे 84.06 टक्के प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे संस्थापक डॉ व्ही नरेंद्र रेड्डी व प्राचार्या डॉ सौजन्या यांनी कौतुक केले आहे.
वणी: बातमीदार