Home Breaking News कीटकनाशक प्राशन करून संपवली ‘जीवनयात्रा’

कीटकनाशक प्राशन करून संपवली ‘जीवनयात्रा’

565
Img 20240930 Wa0028

शेतकरी संकटात, ओल्या दुष्काळाचे सावट

वणी | मारेगाव तालुक्यातील चोपण येथे वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केले. ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत असल्याने त्यांनी हा आत्मघातकी निर्णय घेतला. रविवार दि. 25 जुलै ला ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

गजानन खिरटकर (45) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते चोपण येथील निवासी असून त्यांची हिवरा शेतशिवारात शेती आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा झंझावात सुरू असल्याने संपूर्ण शेती खरडून गेली तर उभी पिके संपुष्टात आली.

काळ्या मातीत पेरलेल्या स्वप्नाची वाताहत झाली आणि भविष्याची चिंता डोकावत असल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. ओल्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकऱ्यांनी आत्मघाती निर्णय घेण्यापूर्वी शासनाने तात्काळ मदत पोहचवणे गरजेचे आहे.

घटनेच्या दिवशी गजानन याने आपल्या घरीच कीटकनाशक प्राशन केले. ही बाब घरच्यांना समजताच त्यांनी तातडीने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
वणी : बातमीदार