Home Breaking News वेकोली व बेंबळा प्रकल्पच नुकसानीला जबाबदार..!

वेकोली व बेंबळा प्रकल्पच नुकसानीला जबाबदार..!

592
Img 20240930 Wa0028

 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
पुरपीडितांना तात्काळ मदत करा

वणी | वणी विधानसभा क्षेत्रात पावसाने दाणादाण उडवून दिली. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली, पिके खरडून गेली. जगाचा पोशिंदा अस्मानी व सुलतानी संकटाने रस्त्यावर आला. याला खऱ्या अर्थाने कारणीभूत वेकोली व बेंबळा प्रकल्पच असल्याचा घणाघाती आरोप राजू उंबरकरांनी केला असून पुरपीडितांना शासनाने व त्या प्रकल्पाने तात्काळ मदत घ्यावी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

वेकोलीच्या बेजबाबदारपणाचा फटका तालुक्यातील कोना या गावाला बसला. गावालगत असलेल्या कोलार पिंपरी खाणीतील उत्खनन झालेल्या मातीचे ढिगारे वर्धा नदीच्या खोऱ्यात टाकण्यात आल्याने संपूर्ण गावच पाण्याखाली आले, शेतीची पूर्णतः वाताहत झाली. वेकोलीने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे वर्धा नदीचे पाणी थबकले आणि कोना, झोला या गावासह अनेक गावे प्रभावित झाले.

वेकोलीच्या गलथान कारभारामुळेच तालुक्यातील 11 गावांना पुराने वेढले. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. उभी पिके डोळ्यादेखत वाहून गेली, शेतजमीन खरडली. भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. हीच परिस्थिती मारेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पामुळे उद्भवली. प्रकल्पाच्या अपुऱ्या कामामुळे व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हिवरा, चोपण, सिंधी, देवाळा गावातील शेतकऱ्यांचा शेतात पाणी शिरले आणि जमीन खरडून गेली आहे.

वणी विभागामध्ये वेकोली व बेंबळा प्रकल्पाच्या गलथान कारभारामुळे अनेक गावांची परिस्थिती बिकट झालेली आहे. तरी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या या प्रकल्पाला सक्त ताकीद देत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनातून केली आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मरेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर वरघट, शहर अध्यक्ष अमित बदनोरे, शुभम भोयर, सुरेश लांडे, प्रविण बोथले, राहुल आत्राम, यांच्यासह देविदास बुटे, प्रशांत बुटे, रामाजी ठावरी, वसंता बोधाने, राकेश धानोरकर, शंकर इनामे, गणेश ढवस, शुभम झिले, चंदन ढवस, प्रकाश ताजने, निलेश ताजने, शेखर कोंढेकर, विशाल ढवस, अंकित ढवस, संतोष भोंग, पवन झिले अतुल कोंडेकर, चंद्रकांत ढवस, राकेश कोंढेकर आदी शेतकरी उपस्थित होते.
वणी : बातमीदार