Home Breaking News ED विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह

ED विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह

560

तहसील समोर धरणे आंदोलन

वणी | भाजपचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. केंद्रीय यंत्रणाचा वापर सूडबुद्धीने करण्यात येत आहे. काँग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूड भावनेने असून त्या विरोधात काँग्रेसने मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय सत्याग्रह धरणे आंदोलन केले.

सत्ताधारी विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केंद्र सरकार करत आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून, नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभ झालेला नाही. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँड्रिंगचा गुन्हा कसा होतो? असे मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

सत्याग्रह आंदोलन करून स्थानिक नेत्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे. काँग्रेसचे नेते ऍड. देविदास काळे, राकेश खुराणा, संजय खाडे, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, विवेकानंद मांडवकर, राजाभाऊ पाथ्रडकर, सुरेश बरडे, भास्कर गोरे, नीलिमा काळे, शालिनी रासेकर, वंदना धगडी, गजरा जयस्वाल, यांची उपस्थिती होती.
वणी : बातमीदार