Home Breaking News गाव बुडाले पुरात, ‘त्या’ भगिनी उंबरकरांच्या दारात

गाव बुडाले पुरात, ‘त्या’ भगिनी उंबरकरांच्या दारात

1202

प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे दर्शन

वणी: तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती, अनेक गावे पाण्यानी अक्षरशः वेढलेल्या अवस्थेत. गावाच्या सभोवताल पाणीच-पाणी त्यात भाऊ- बहिणीच्या नात्यातील पवित्र सण, ऐनवेळी संकटात धावून येणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी भगिनींची चाललेली धडपड आज अनुभवता आली. कोना, चिंचोली, पहापळ येथील भगिनी, चक्क पुरात वेढलेल्या गावातून मनसेचे राजू उंबरकर यांच्या दारात पोहचल्या. याप्रसंगी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे दर्शन उपस्थितांनी अनुभवले.

रक्षाबंधन हा सण ‘रक्षा’ आणि ‘बंधन’ या दोन शब्दांपासून बनलेला आहे. संस्कृत भाषेनुसार या सणाचा अर्थ “संरक्षण करणारे बंधन” असा होतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे उंबरकर आणि महाराष्ट्र सैनिकच होते. अन्नधान्याच्या किट सह मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात आली. तर मुक्या जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करून भावाचा धर्म निभावला.

एकाच महिन्यात दोनवेळा आपदा आली, पुन्हा गावे पाण्यात बुडाली. त्यातच बहीण- भावाचा पवित्र सण रक्षा बंधन आला. पुराच्या पाण्यातून चालत येत भगिनींनी राजू उंबरकर यांचे औक्षण करत राखी बांधली. यात कोना येथील कविताबाई बोधाने, नीता येलादे, अनिता तुरानकर, साधना आवारी, रेखा कुचनकर, रोशनी वरपटकर, बबीता उपरे तर पहापळ या गावातून कुनताबाई वाढई, ईठाबाई येरकाळे, मंदाबाई बोधे, संगिताबाई बोकडे व चिंचोली येथील सविता भोयर, किरण भोयर, छाया बोंडे, कोकीळाताई चाहारे, आनिता चाहारे, शुभागी ऊयके, लता बोंडे यांचा समावेश होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापनेपासून मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची नाळ ग्रामीण भागात कायमच जोडलेली आहेत. आपल्या हक्काचा भाऊ म्हणून राजू उंबरकर यांच्या घरी शेकडो महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा पार पडतो. यावेळी सुध्दा मोठयासंख्येने भगिनी यावेळी सहभागी झाल्या होत्या.

यावेळी संपूर्ण महिलांचे स्वागत राजू उंबरकर यांच्या सौभाग्यवती तृप्ती उंबरकर यांनी केले. तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम (त्रिंबके), महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, वैशाली तायडे, जोती मेश्राम यांच्यासह ग्रामीण भागातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वणी: बातमीदार