Home Breaking News स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भव्य रक्तदान शिबीर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भव्य रक्तदान शिबीर

388

संजय निखाडे मित्रमंडळाचे आयोजन

वणी: चांद्रपूच्या शासकीय रक्तपेढी मध्ये अपुरा रक्तसाठा आहे. यामुळे कोणत्याही रुग्णाला रक्ताची उणीव भासू नये याकरिता संजय निखाडे मित्रमंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि: 13 ऑगस्टला शिंदोला येथे भव्य रक्तदान शिबीर राचे आयोजन केले आहे. याप्रसंगी रक्तदात्याना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राजकिय पक्ष, सामाजिक संघटना आपापल्या परीने विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसत आहे. संपूर्ण वर्षभर जनहितार्थ कार्यक्रम राबवणारे शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांना शासकीय रक्तपेढीत अपुरा रक्तसाठा असल्याचे कळताच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

वणी उपविभाग औद्योगिकक्रांतीने भरभराटीस आला आहे. कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या याकरिता भूगर्भातील मौल्यवान खनिजाचे होत असलेले उत्खनन, त्यावर आधारित उद्योग धंदे व होणारे दळणवळण आणि वाढणारे प्रदूषण मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे आहे. त्यातच जड वाहनाची वर्दळ यामुळेच वाढलेले अपघात रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत ठरते आहे करिता रक्तपेढीत मुबलक प्रमाणात रक्तसाठा असावा म्हणूनच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे निखाडे यांनी स्पष्ट केले आहे.

शिंदोला येथे शनिवारी डॉ. रमेश जोगी यांच्या दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्याना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी पंचायत समिती सदस्य रुपलता निखाडे, संजय निखाडे मित्र मंडळ व स्थानिक ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
वणी: बातमीदार