● बक्षिसांची लयलूट, प्रथम पुरस्कार तीन हजार एक
वणी: खंडोबा – वाघोबा देवस्थान सभागृहात मंगळवार दि. 16 ऑगस्ट ला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त “खुली वक्तृत्त्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही तसेच “भारतीय स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी यशोगाथा” याविषयावर होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खंडोबा – वाघोबा देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, धनगर समाज संघर्ष समिती, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला मंच, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने “खुली वक्तृत्त्व स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत असेल, स्पर्धेच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचा अंतीम अधिकार आयोजकांचा असणार आहे. प्रवेशाची अंतिम तारीख रविवार दि. 14 ऑगस्ट असेल. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. प्रथम पुरस्कार 3001 रुपये, द्वितीय पुरस्कार 2001रुपये तर तृतीय पुरस्कार 1001 रुपये रोख व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी विलास शेरकी- 9657703186, रघुनाथ कांडरकर- 9764088001, विकास चिडे- 7744929747, गौरव उगे- 9096110438 यांचे सोबत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी :बातमीदार