● औचित्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे
वणी | देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवस सातत्याने राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात येत आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून राजूर येथेही जि. प. शाळेला लोकसहभागातून उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने तसेच शिक्षणावरील खर्च कमी केल्यामुळे शासकीय प्राथमिक शाळेला प्राथमिक गरजा पूर्ण करणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. हीच परिस्थिती ओळखून राजूर येथील सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार यांनी गावातील लोकांच्या सहभागातून गावात असलेल्या तीन जि. प. शाळांना शुद्ध व थंड पाणी ठेवण्या करिता कॅन्स व मुलांना विविध कार्यक्रमात वापर करण्यासाठी मेटिंग (प्लस्टिक सतरंजी) आदी वस्तूंची भेट देण्यात आली.
याप्रसंगी सरपंच विद्या पेरकावर म्हणाल्या की, गावातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जी मदत व गरज भासेल त्यासाठी लोकवर्गणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
आयोजित कार्यक्रमाला उपसरपंच अश्विनी बलकी, अशोक वानखेडे, डॅनी सॅन्ड्रावार, डेव्हिड पेरकावार, वामनपाटील बलकी, कुमार मोहरमपुरी, ऍड. अरविंद सिडाम, अनिल डवरे, बाळाभाऊ हिकरे, संजय पिसे, नितीन मिलमिले, समय्या कोंकटवार, मंगेश जुनघरी, चंदू मोडक, प्रकाश बलकी, विजय प्रजापती, विजय कंडेवार, सुदर्शन शेंगरपवार, नाना आत्राम, पायल डवरे, चेतना पाटील, दीपाली सातपुते, वंदना देवतळे, मंजुषा सिडाम, सुचिता पाटील, अस्मिता मोहरमपुरी व राजूर जि प मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश निरे, हिंदी प्रा. शा. चे मुख्याध्यापक रेखा सरकारे, ईजारा येथील मराठी प्रा. शा. चे मुख्याध्यापक भाग्यश्री तेडेवार व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वणी: बातमीदार