● जयघोषाने आसमंत दुमदुमला
वणी: स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समीतीच्या माध्यमातून भव्य तिरंगा सन्मान मोटर साईकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 10 वाजता SDO डॉ. शरद जावळे यानी तिरंगा रॅलीला झेंडा दाखवला. याप्रसंगी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, तहसिलदार निखिल धुळधर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना येथील नागरिकांनी उत्स्फुर्तरीत्या सहभाग नोंदवला. अशाप्रकारच्या देशहीतार्थ कार्यात वणीकर जनतेचा नेहमीच सहयोग राहीलेला आहे. भव्य तिरंगा मोटर साईकल रॅलित सर्व राजकीय तथा सामाजीक कार्य करणा-या संस्था व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकवृंद, तसेच नागरिक सहभागी झाले होते.
रॅलीची शासकीय मैदानातून सुरवात झाली. तर मार्गक्रमण टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक,मोठी कमान,तुटकी कमान, गाडगेबाबा चौक, नृसिंह आखाडा, दिपक चौपाटी, काठेड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सर्योदय चौक, टागौर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, बस स्थानक, साई मंदिर, जगन्नाथ बाबा मठ नांदेपेरा रोड, डि.पी. रोड, विठ्ठलवाडी, एस.बी. लॉन, लोकमान्य टिळक महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक मार्गे शासकीय मैदानात राष्ट्रगिता नंतर सांगता झाली.
याप्रसंगी रवि बेलुरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, राजुभाऊ ऊबंरकर, विजयबाबु चोरडिया, राकेश खुराणा, सुधिर साळी, दिपक छाजेड, पौर्णीमा शिरभाते, संध्या रामगिरवार, निलीमा काळे, मंगला झिलपे, आरती वाढंरे, अल्का जाधव, मंदा बागंरे, ललीता बरशेट्टीवार, अंकुश अटारा, लवली लाल, नितीन शिरभाते राजकिय पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक महिला व नागरिक सहभागी झाले होते.
वणी: बातमीदार