Home Breaking News युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

1550

धोपटाळा येथील घटना

वणी : तालुक्यातील धोपटाळा येथील 23 वर्षीय युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

सदानंद विठ्ठल दोरखंडे (23) असे युवा शेतकऱ्यांचे नाव असून तो धोपटाळा येथील रहिवासी आहे. त्याच्या नावाने तीन एकर जमीन आहे. मात्र सततच्या नापिकी मुळे तो आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटे तो आपल्या शेतात गेला व झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
वणी: बातमीदार