Home Breaking News वेकोली कर्मचाऱ्याने केला आत्महत्त्येचा प्रयत्न

वेकोली कर्मचाऱ्याने केला आत्महत्त्येचा प्रयत्न

4258

प्रकृती चिंताजनक, संघटनांचा वाद

वणी: वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या घोंसा कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या वेकोली कर्मचाऱ्याने आत्महत्त्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार दि. 22 ऑगस्ट ला दुपारी दोन वाजता घडली. संघटनेच्या वादातूनच आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

गजानन पिंपळकर (54) असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते नेहमी प्रमाणे घोंसा येथील कोळसा खाणीत कर्तव्यावर गेला होता. दुपारी ते खाणीतून निघाले मात्र घरी न जाता वणी- घोंसा मार्गावरील नाग मंदिरात पोहचले व तिथे त्याने विषारी औषध प्राशन केले. ही बाब काही वेकोली कर्मचाऱ्यांना कळताच त्याला तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पिंपळकर यांनी नुकतीच एक कर्मचारी संघटनेचं सभासदस्यत्व स्वीकारलं होतं. त्यामुळे जुन्या संघटनेचे काही पदाधिकारी त्याला मानसिक त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. विष प्राशन करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवल्याचे बोलल्या जात असून पोलीस कारवाई नंतरच त्या चिठ्ठीतील नावे उघड होणार आहे. या घटनेमुळे वेकोलीतील संघटनांचा वाद चिघळण्याची शक्यता बळावली आहे.
वणी: बातमीदार