Home Breaking News अवैद्य दारूसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैद्य दारूसह सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

979

तिघांवर गुन्हा नोंद, वणी पोलिसांची कारवाई

वणी: मोहर्ली ते विरकुंड मार्गावरून चारचाकी वाहनातून अवैद्य दारूची खेप रवाना होत असल्याची गोपनीय माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला असता. वाहन व घरझडतीतून तब्बल 29 हजार 648 रुपयांची दारू व 4 लाख रुपये किमतीची स्विप्ट कंपनीची कार ताब्यात घेऊन तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सौरभ किशोर नगराळे (20), रितीक रवी पत्नीवार (19) हे दोघेही राहणार राजूर कॉलरी व संगीता कैलास मडावी रा. मोहर्ली असे गुन्हा नोंद झालेल्या अवैद्य दारू विक्रेत्यांची नावे आहेत. पोलिसांनी बुधवार दि 24 ऑगस्टला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली.

वणी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे हे रात्रपाळीत कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी गोपनीय माहितगाराने चारचाकी वाहनातून अवैद्य दारूचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. कोणताही विलंब न करता ते पोलीस पथकासह मोहर्ली- विरकुंड मार्गावर पोहचले आणि सापळा रचला.

मोहर्ली ते विरकुंड जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तलाठी कार्यालया समोर स्विफ्ट कंपनीची कार क्रमांक (MH- 29- AD- 5359) ही उभी दिसली. यावेळी वाहन चालकांची कसून चौकशी केली असता वाहनात 22 हजार 848 रुपयांची देशी दारू आढळून आली.

मोहर्ली येथे वास्तव्यास असलेल्या संगीता कैलास मडावी यांच्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता 6 हजार 800 रुपयाची देशी दारू हस्तगत करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिवाजी टिपूर्णे, पो. कॉ. मोहम्मद वसिम मोहम्मद अकबर यांनी केली.
वणी: बातमीदार