Home Breaking News गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

169

हंसराज अहिर यांची उपस्थिती

वणी: आजचे विद्यार्थी हे या देशाचे भवितव्य आहे. या देशाचे भवितव्य निश्चित करायचे असेल तर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केले. ते भारतीय जनता युवा मोर्चाद्वारा आयोजित विद्यार्थ्यांच्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.

शेतकरी मंदिरात दि. 21 ऑगस्टला आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपाचे नेते विजयबाबू चोरडिया, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, किशोर बावणे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, बंडू चांदेकर, महेश उराडे, वर्षा खुसपूरे, प्रीती बिडकर, शंकर बांदुरकर, कैलास पिपराळे, संतोष डंबारे, राकेश बुग्गेवार उपस्थित होते.

वणी तालुक्यातील सीबीएससी मध्ये बारावी 80% च्या वर व दहावीतील 85% च्यावर गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. व राज्य बोर्डाचे दहावी व बारावीत 80% च्या वरच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील एकूण 14 शाळेतून 288 विद्यार्थ्यांचा व शहरी भागातून 11 शाळेतून 200 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळेस विद्यार्थी, पालक तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन नितीन वासेकर यांनी केले. आभार प्रदर्शन शुभम इंगळे यांनी केले. आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संदीप बेसेकर, शुभम गोरे, निखिल खाडे, अक्षय देठे, वैभव मांडवकर, दीपक पाऊणकर, वैभव मेहता, प्रज्वल ठेंगणे, वैभव कौरासे, मोरेश्वर कुत्तरमारे, वैभव कळसकर सुहास मोहाडे आशिष पायघन यांनी प्रयत्न केले.
वणी: बातमीदार